उस्मानाबाद / प्रतिनिधी-
पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत मिळावी या मागणीसाठी जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या खरिपातील उडीद, मूग आदी पिके काढणीचे काम सुरू आहे. या पावसामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सोयाबीनलाही पावसाच्या माऱ्यामुळे कोंब फुटले असून याचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य सतीश दंडनाईक, जिल्हा सरचिटणीस (संघटन) नितिन भोसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे, सह प्रसिद्धीप्रमुख विनायक कुलकर्णी तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.