उमरगा / प्रतिनिधी-
तालुक्यातील उमरगा, मुरुम, दाळींब, नारंगवाडी, मूळज महसूल मंडळात गुरूवारी (ता.१७) पहाटे झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान बेन्नीतूरा नदीला मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यातील अतिरिक्त पाणी आणि बेडगा लगतच्या ओढा ओंसडून वहात असल्याने उमरगा - डिग्गी मार्गावरील बेडगा गावाजवळील फरशी पुलावरून चार ते पाच फुट पाणी वहात असल्याने या मार्गावरील वहातूक ठप्प झाली होती.
उमरगा तालुक्यात गेल्या चार दिवसापासुन पावसाचे वातावरण आहे मात्र गुरूवारी पहाटे झालेला पाऊस मोठा होता. त्यामुळे अनेक शेतातील पिकात पाणी शिरले आहे, बांध फुटले आहेत. उडीदाच्या राशी अंतिम टप्यात आहेत शिवाय आगोटी पेरलेल्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. त्यात पावसाचा मारा झाल्याने नुकसान होत आहे. दरम्यान चार तासात झालेल्या महसूल मंडळ निहाय पावसाची मिलीमीटरमधील नोंद व कंसात आत्तापर्यत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे : उमरगा - ९१.९ (५४६.५), दाळींब - १८०.३ (५११), नारंगवाडी - १३५.६ (५२७.२), मुळज- १३१.४ (५३१.१), मुरुम -१६२.५ (३४३.१). नुकताच झालेला पाऊस १४० मिलीमीटर तर आतापर्यंत ४९२.४ (६१.५८) मिलीमीटर.
बेडगा पुलावर पाणी
बेन्नीतुरा नदीवरील बेडग्याच्या दिशेने जाणाऱ्या फरशी पुलावरून पाणी जात असल्याने गुरुवारी सकाळपासून दुपारपर्यंत वहातूक ठप्प होती. मागच्या तीन वर्षात चार वेळा रस्त्यावरून पाच फूटापेक्षा अधिक पाणी गेल्याने वहातुक बंद होण्याचा प्रकार झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने नाबार्ड योजनेतुन पुलाच्या बांधकामाचा दोन प्रस्ताव पाठविला आहे. मात्र तो मंजुर होऊ शकला नाही. मे २०२० मध्येही नाबार्डकडे पुलाच्या बांधकामासाठी दिड कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र शासनस्तरावर या कामाला मंजुरी मिळत नाही. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता संजय विभूते यांनी सांगितली.