उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने नुतन जिल्हाधीकारी मा.कौस्तुभ दिवेगावकर यांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात  आला.
या प्रसंगी उस्मानाबाद जिल्हातील विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली, सदर बैठकीमध्ये कोव्हीड १९ प्रतिबंधात्मक उपाय योजणे बाबत चर्चा करण्यात आली, अतिवृष्टी झालेल्या ठिकाणाचे पंचनामे करुन शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, सोलापुर-तुळजापुर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचा जास्तीत जास्त भार रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन करणे बाबत चर्चा करण्यात आली, उस्मानाबाद येथे होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाकरीता अतिरिक्त जागा राखीव करणे बाबत चर्चा करण्यात आली, उस्मनाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ लवकरात लवकर होणे बाबत चर्चा करण्यात आली, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक २००२ पासुन अडचणीत आहे, तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखाण्याकडे मोठया प्रमाणात निधी अडकलेला आहे. त्याकरीता तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखाना सुरु होणे आवश्यक आहे. तरी प्रॉव्हीडंट फंड संदर्भातही मा. जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा. दोन्ही कारखाने चालु झाले तर बँकही चालू होईल व शेतक-यांचाही फायदा होईल या करीता चर्चेतील सर्व मुद्यावर मा. जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेवुन जिल्हयाचे प्रश्न मार्गी लावावेत. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. सुरेश (दाजी) बिराजदार यांनी निवेदन केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते संपतराव डोके, जिल्हासरचिटनीस नितीन बागल, शहरकार्याध्यक्ष सचिन तावडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top