उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 उस्मानाबादचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना कोचिंग क्लासेस सुरु करणे व इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी महोदयांनी सध्या कोरोनाची टोकाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कदाचित पुढील महिण्यात परिस्थितीत सुधारणा झाल्यास पुढील अनलॉक टप्प्यात कोचिंग क्लास क्षेत्राचा विचार होईल असे मत व्यक्त केले.
शाळांमध्ये जास्त गर्दी होऊ शकते. परंतु, कोचिंग क्लासची संख्या जास्त असल्याने विद्यार्थी विभागले जाऊन सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन होऊ शकते तसेच जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण प्रणालीपासून दूर आहेत ते विद्यार्थी कोचिंग क्लासमुळे शिक्षणाच्या प्रवाहात येतील असे आम्ही संघटनेच्या वतीने सांगितले. जिल्हाधिकारी महोदयांच्या उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या नियुक्तीबद्दल त्यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. निवेदन देताना रवी शितोळे सर, डॉ. आनंद मुळे सर, राहुल नाईकवाडे सर, वैजिनाथ मिटकरी सर, शिवाजी गाढवे सर उपस्थित होते.
 
Top