उमरगा/ प्रतिनिधी
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनात त्यागमूर्ती माता रमाईचे मोलाचे स्थान आहे. त्यांची सावली बनून बोधिसत्वाचे जीवन जगत समाजाच्या उद्धारासाठी जीवाचरान करून त्यानीं खंबीर पणे सात दिली.घर,संसार,मुलंबाळं याचं संगोपन करीत कोट्यवधी जनतेची आई होऊन त्यानीं बोधिसत्व परंपरा उज्वल केली असल्याचे प्रतिपादन धम्मचारी प्रशील ( दापोली) यांनी केले.
त्रिरत्न बौद्ध महासंघ उस्मानाबाद लातूरच्या वतीने वर्षावास कालावधीतील धम्मप्रवचन मालिकेचे सहावे पुष्प रविवारी दि ६ रोजी गुंफण्यात आले या वेळी “डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनात माता रमाईचे योगदान” या विषयावर ते बोलत होते.कार्यक्रमास केंद्राचे चेअरमन धम्मचारी ज्ञानपालित,धम्मचारीणी अमोघनेत्री,( पुणे)धम्मचारीणी यशोश्री, (दापोली)आदींची उपस्थिती होती. प्रारंभी त्रिरत्न बौद्ध महासंघ डेहराडून येथील जेष्ठ धम्मचारी बोधिसागर यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहण्यात आली.
पुढे बोलताना प्रशील म्हणाले की,लहान पनापासूनच माता रमाईच्या जीवनात बोधिसत्व परंपरेचा प्रभाव होता.भगवान बुद्धाच्या सीगालवाद शिकवणुकीचे ते काटेकोर पणे आचरण करीत होत्या.सासर आणि माहेर यात त्या फरक करीत नव्हत्या,बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या विचारधारेचा त्याच्या कुटूंबावर लहान पनापासूनच प्रभाव होता.त्याच्या हृदयात करुणेची कोमलता होती,मायेची ममता होती,चारित्र्याची पवित्र्यता होती.आणि संवेदन मनाच्या संवेदनशिलतेच्या त्या मुर्तीमंत प्रतीक होत्या.आजारी असलेल्या मुलांना औषधे उपलब्ध न झाल्याने त्यांच्या इंदू,रमेश,गंगाधर आणि राजरत्न या चार मुलांना प्राणास मुकावे लागले,इंग्लड मध्ये अभ्यास करून डॉ.बाबासाहेबांची ज्ञानलालसा तृप्त होत नव्हती तर घरातील संकटांनी रमाईला उसंत मिळत नव्हती एका मागून एक संकटाचा सामना करीत मोठ्या हिमतिने रमाईने बाबासाहेबाना मदत केली आहे.धारवाड येथील वसतिगृहात शिकणाऱ्या मुलांना भोजनासाठी अन्न नसल्याचे समजताच कोणताही विचार न करता त्यानी हातातील सोन्याच्या बांगड्या अधीक्षक वराळे यांना काढून देतात आणि त्यातून राशन आणण्यास सांगतात,स्वतः स्वयंपाक बनवून त्यानीं मुलांना भोजन बनवून देतात,हे सर्व बोधिसत्वच करू शकतात त्यामुळे त्या बोधिस्तवाचे जीवन जगल्या असे ते म्हणाले.दान, शील, शांती, उत्साह,समाधी प्रज्ञा,त्याच्या अंगी होती डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्याणाची भावना त्यांच्या हृदयात कायम होती.त्यानां अनेक धमक्या येत होत्या त्यामुळे बाबांची त्याना खूप चिंता वाटत होती.करूणा मैत्रीची भावना त्याच्या मनात कायम होती असे ते म्हणाले.
या वेळी धम्मचारी रत्नपालित, धम्मचारी विरतकुमार,धम्मचारी प्रज्ञाजित,धम्मचारी नागरत्न ( छत्तीसगड) आदींची उपस्थिती होती पूजेचे नेतृत्व धम्मचारी ज्ञानपालित यांनी केले.सूत्रसंचालन धम्मचारी कल्याणदस्सी यांनी केले.धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.