तुळजापूर / प्रतिनिधी-
कुंटुंबातील व्यक्ती समजून कोरोना रुग्णावर उपचार करा माणसे मरता कामा नये याची दक्षता घ्या तालुक्यात कोरोना चा रुग्णांची संख्या 1156 असुन सध्यास्थितीत 229 रुग्णावर उपचार सुरु आहे. तालुक्यात माझी गृहलक्षमी माझी जबाबदारी या भावनेतुन माझे कुंटुंब माझी जबाबदारी राबवुन कोरोना प्रादुर्भाव रोखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.
ते येथील तहसिल कार्यालयात वाढत्या कोरोना रुग्णांचा पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या सर्व विभाग प्रमुखांचा आढावा बैठकीत बुधवार दि16रोजी बोलत होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले कि तुळजापूरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या योग्य नाही यासाठी नागरिकांनी सजग राहावे मास्क वापरणे सोशल डिस्टंन्स पाळणे यावर भर द्यावा आरोग्य नगरपरिषद महसुल पंचायत विभागाने तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती कुंटुंबा पर्यत जावुन त्यांचे तापमान आँक्सीजन तपासावे सर्दी खोकला ताप यसह इतर दुर्धर आजारग्रस्त रुग्णांचा शोधु घेऊन जे संशियत असतील त्यांना त्यांच्या घरी विलगीकरण व्यवस्था असेल तर करुन सदर रुग्णाची कोविड 19तपासणी करुण तात्काळ उपचार करावेत. पुजारी बांधवांनी स्वताहुन कोरोना चाचणी करुन घेण्याचे सुचित केले शहरात प्रवैश करणाऱ्या भाविकांची तपासणी करण्यासाठी चेकपोस्ट तयार करुन येथे तापमान आँक्सीजन तपासण्याचा सुचना दिल्या ज्यांच्या घरात कोरोना रुग्ण आढळला आहे त्यांच्या घरी विलगीकरणाची सोय असेल तर त्यांचे स्वंयघोषणापञ घेवुन डाँक्टरचा सल्याने गृहविलगीकरणास परवानगी द्यावी असे यावेळी सांगितले .सध्या सर्वञ 144 कलम लागू असुन तरीही लोकशासन आदेश पालन करीत नसतील एकञित येवुन गर्दी करीत असतील तर कारवाई करण्याचा सक्त सुचना दिल्या.
या बैठकीस एसडीओ रामेश्वर रोडगे, तहसिलदार सौदागर तांदळे, नोडल अधिकारी महेंद्रकुमार कांबळे , उपजिल्हारुग्णालय वैद्यकीय अधिकारी डाँ चंचला बोडके, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, पो. नि हर्षवर्धन गवळी, सपोनी जगदीश राऊत, सपोनी काळे, तुळजापूर नगरपरिषदचे ओ.एस वैभव पाठक, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डाँ सुहास पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी उपस्थितीत होते.