परंडा /प्रतिनिधी :-
कांदा निर्यात बंदीचा आदेश तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटने च्या वतीने परंडा तहसीलदार यांच्याकडे दि.१६ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की केंद्राने घेतलेले कांदा निर्यात बंदी मुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थीक नुकसान होणार असल्याने निर्यातबंदीला विरोध केला आहे. मे महिन्या मध्ये कांद्याला बाजार भाव नव्हते तसेच लॉकडाऊन मुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांदा चाळी मध्ये साठवून ठेवला होता, मात्र गेल्या वीस-पंचवीस दिवसापासून वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाल्याने कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली होती सध्या अडीच ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल कांद्याला बाजार भाव मिळत होता पण केंद्राने कांदा निर्यात बंदी लागू केल्यामुळे बाजारभाव घटण्याची शक्यता आहे त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा अशा प्रकारचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिले आहे निवेदनावर तालुकाध्यक्ष शंकर घोगरे , शहराध्यक्ष सादातअली काझी ,रामेश्वर नेटके, शिवाजी ठोंबरे, अशोक साळुंके, मारुती गोडगे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.
कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकर्यांच्या चार पैसे मिळतील म्हणून आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र केंद्र सरकारने कांदानिर्यातबंदी लागू करून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत ढकलण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी चेहरा जनतेसमोर आले आहे.कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकर घोगरे यांनी दिला आहे.