उस्मानाबाद / प्रतिनिधी
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाला, विद्यापीठ अनुदान आयोग,(यु.जी.सी) नवी दिल्ली, यांंनी चालू शै.वर्षात (२०-२१) रोजगाराभिमुख असणारे “ब्राॅडकास्टिंग अॅण्ड जर्नालिझम “व “प्रोफेशनल अकाउंटिंग अॅण्ड टॅक्सेशन” या पदवीच्या दोन कोर्सना नुकतील मान्यता प्राप्त झाल्याचे, प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी सांगितले आहे.
या दोनही कोर्सला १२वी कला,वाणिज्य व विज्ञान या शाखातुन पास झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात सदर दोनही कोर्स तीन वर्षाचे असुन या कोर्सची प्रवेश प्रक्रिया चालू झाली असुन ज्या विद्यार्थ्यांना या कोर्सला प्रवेश घ्यायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी या कोर्सचे समन्वयक प्रा.संदिप देशमुख यांना संपर्क करावा व या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी ३०आॅक्टोंबर ही शेवटची तारीख आहे.
हे दोनही पदवीचे कोर्स रोजगाराभिमुख असल्याने हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीसाठी संधी मिळणार असल्याने उस्मानाबाद शहर व परिसरातील विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घेण्याचे, प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी आवाहन केले आहे.