तेर / प्रतिनिधी   

उस्मानाबाद तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या तेरणा मध्यम प्रकल्प  २१ सप्टेंबर  पासून पूर्ण क्षमतेने भरुन वाहत असल्याने धरणा खालोखाल असलेले तेरणा नदीचे पात्रही तुडुंब भरून वाहत आहे त्यामुळे वारकरी संप्रदायातील थोर संत संतशिरोमणी श्री संत गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरा जवळील शिरपूर पॅटर्न पूर्ण क्षमतेने भरुन वाहिला आहे .त्यामुळे तेरसह परिसरातील चार ते पाच किलोमीटर अंतरावरील शेती शिवारातील जलस्त्रोताच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.   

 तेर ता उस्मानाबाद येथील ग्रामस्थांची सत्तत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे तेरणा मध्यम प्रकल्प कोरडा पडल्यानंतर सत्तत पिण्याच्या पाण्यासह सांड पाण्याचा गंभीर बनत असलेला प्रश्न मिटवा तसेच परिसरातील जलस्त्रोताच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी माजी पाटबंधारे मंञी डाँ.पद्मसिंह पाटील यानी मंदीराजवळ दगडी घाट व पूलकम बंधारा केल्यामुळे पावसाळयात याठीकाणी पाणी साठले जात आहे.तसेच  जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा आर्चनाताई पाटील यांच्या संकल्पनेतून सन २०१२-१३ साली संत गोरोबा काका मंदिरा जवळील तेरणा नदीच्या पात्रात तेरणा धरणा पासून ते तेर येथील शैनेश्वर मंदिरापर्यंत ४० मीटर रुंद व ३ मीटर खोलीकरण करून शिरपूर पॅटर्न राबविण्यात आला आहे .सध्या हाच शिरपूर पॅटर्न तेरणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरुन वाहत असल्याने गोरोबा काका मंदिरा जवळील शिरपूर पॅटर्न ही तुडुंब भरला आहे  .त्यामुळे तेरसह परिसरातील जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरावरील शेती शिवारातील जलस्त्रोताच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे विशेष म्हणजे शिरपूर पॅटर्न मधील साठलेल्या पाण्यामुळे गोरोबा काकांच्या समाधी मंदिराच्या  सौंदर्यात भर पडली असल्याने नागरिकांची पाणीसाठा पाहण्यासाठी  गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 
Top