उस्मानाबाद / प्रतिनिधी-
येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा विमा एजन्ट हनुमानदास (बाबुजी) कस्तुरचंद सारडा (७१) यांचे शनिवारी सायंकाळी सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात हरिश सारडा व अमित सारडा ही दोन मुले व एक मुलगी तसेच दोन बंधू असा परिवार आहे. रामजीवन सारडा व श्रीकिसन सारडा यांचे ते कनिष्ठ बंधू होत. - हनुमानदास सारडा यांच्या निधनाबद्दल स्थानकवासी जैन समाजाचे विजयकुमार बेदमुथा, महावीर कोठारी, तेजराज मुथा, कांतीलाल कोचेटा, डॉ. प्रकाश छल्लाणी, अॅड. शांतीलाल कोचेटा, अभय कोचेटा आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले.

 
Top