वाशी / प्रतिनिधी
वाशी तालुक्याच्या व वाशी शहराच्या सर्वांगीण विकास कामाच्या दृष्टीने व विद्युती करणाच्या कामास नगर पंचायत वाशी च्या वतीने व मा. ना. श्री. शंकररावजी गडाख साहेब, पालक मंत्री उस्मानाबाद जिल्हा, मा. खासदार ओमराजे निंबाळकर ,आमदार श्री. तानाजी सावंत साहेब, यांच्या अथक प्रयत्नाने व मा. शिवसेना नेते मा. प्रशांत बाबा चेडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कामाची दखल घेऊन वाशी तालुक्यातील व वाशी शहरातील विद्युतीकरणाच्या कामास मंजुरी मिळाल्याची माहिती प्रशांत चेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भूम येथील १३२ kv येथून वाशीकडे येणारे ३३ kv लाईन वरील कंडक्टर नवीन बसविणे तसेच येथून येणारी मेन लाईन ३३ kv पूर्णपणे १५ कि.मी. पार्डी ते भूम नवीन करणे ,वाशी शहरातील प्रमुख रस्ता शिवाजी नगर येथील ४० वर्षापासुनचे सिमेंट पोल बदलून त्या ठिकाणी ११ मीटरचे लोखंडी पोल बसविण्यास मंजुरी मिळालेली आहे. त्याचे काम चालू आहे.वाशी शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत चालू राहावा व नागरिकांना या पासून होणाऱ्या त्रासापासून मुक्त करणेसाठी शहराची विभागणी करून १५ A.B स्विच बसवण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे व ते काम प्रगतीपथावर आहे . वाशी शहरातील नवीन वस्तीवाढ क्षेत्रामध्ये नवीन स्ट्रीट लाईट करिता २०० पोलची मंजुरी देण्यात आलेली आहे . तालुक्यातील व शहरातील विद्युतीकरणाचे कामास अमुलाग्र बदल होऊन यापुढे वाशी तालुक्यातील व शहरवासियांना विद्युत पुरवठा सुरळीतपणे मिळणार आहे .या सर्व मंजूर झालेल्या कामाचे प्रक्रियेस मा.श्री.श्रीकांत पाटील साहेब अधिक्षक अभियंता उस्मानाबाद ,मा.श्री.महेंद्र वाघमारे साहेब कार्यकारी अभियंता ,मा.श्री रमेश शेंद्रे साहेब ,उपकार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कंपनी वाशी तसेच येथील सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य याकामी लाभलेले आहे. यावेळी नगरअध्यक्ष नागनाथ नाईकवाडी ,उपनगरअध्यक्ष प्रसाद जोशी ,माजी नगरअध्यक्ष नितीन चेडे उपस्थित होते .