उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १५ जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे झेडपी अध्यक्षा अस्मिता कांबळे, प्रशांत कांबळे आदींनी रक्तदान केले. महिला रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे झेडपी अध्यक्षा कांबळे यांनी वाढदिवसाची औपचारिकता टाळून रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हे शिबिर घेण्यात आले. दरम्यान कांबळे यांचा विविध संस्था, संघटनांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांनीही अस्मिता कांबळे यांना शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबिरासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सहकार्य केले.