उस्मानाबाद / प्रतिनिधी -
आई लॉन्स शेजारील प्रा. शामराव दहिटणकर यांच्या सत्संग सभागृहात गणेश उत्सवा दरम्यान वसाहतीतील मुलांच्या सहभागातून श्री गणेश याग संपन्न झाला.
कोरोना महामारी संसर्गाने सर्व जग ठप्प झाले पण या संकटाला ही सुवर्ण संधी मानून सेवानिवृत्त प्रा.शामराव दहिटणकर यांनी त्यांच्या निवासी वसाहतीतील ५ ते ६ मुले एकत्र करून त्यांना या ताळेबंद कालावधीत रामरक्षा, भीमरूपी ,प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, श्री गणपती अथर्वशीर्ष , गणपती स्तोत्र ,विष्णुसहस्त्रनाम, आदी २० स्तोत्रे शिकून गेली चार पाच महिन्यात नित्य पठण करून घेतले परिणामात : त्यांना सर्व स्तोत्रांचे आज रोजी अस्खलित म्हणता येतात आजपर्यंत त्यांना चार भगवद् गीतेचे ४ अध्याय ही शिकून झाले व त्यांच्या धार्मिक आध्यात्मिक पाया तयार झाला गणेशोत्सवाच्या अगोदर पर्यावरण पूरक मातीच्या मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा शेषनाथ वाघ यांनी संस्कार भारतीच्या माध्यमातून घेतली व मुलांनी सुंदर गणेशांच्या मातीच्या मूर्ती तयार केल्या .गणेशाच्या स्थापनेनंतर गणेशयाग करण्याची कल्पना पुढे आली व केवळ चार पाच मुलांनी एका दिवसात सहस्त्र गणपती अथर्वशीर्षाचे पाठ केले.
तसेच सहस्त्र मोदकांचे हवन मुलांनीच यज्ञ कुंडाच्या सभोवती बसून श्री अथर्वशिर्ष पठण करीत यज्ञात हर्विद्रव्य अर्पण केले तेहि भारतीय वेशभूषेत मुलींनी नऊवारी साडी नेसून तर मुलांनी धोतर उपरणे परिधान करून यज्ञ समारंभ मोठ्या उत्साहात कोविड १९ नियम पाळून संपन्न केला. यावेळी भारतीय संस्कृती परंपरेचे अनोखे दर्शन घडवले. सत्यहरी वाघ, विशाखा बागल, व्यंकटेश वाकुरे, सार्थकी वाघ ,अर्णव दहिटणकर, कृष्णा इंदापूरकर ,निकिता इंदापूरकर या विद्यार्थ्यांनी यज्ञ समारंभात सहभाग घेतला त्यांना मार्गदर्शन शामराव दहिटणकर निलेश कुलकर्णी ,श्रीहरी कुलकर्णी ,समर्थ कुलकर्णी यांनी केले हा गणेशयाग यशस्वी करण्याकरिता मार्गदर्शन केले. बंडोपंत जोशी, डॉ.शतानंद दहिटणकर डॉ. पल्लवी दहिटणकर ,शेषनाथ वाघ सागर रामभाऊ धत्तुरे ,सुनिता दहिटणकर ,प्रगती बागल , साै. मालखरे,सौ. वाकुरे , सौ. पाटील , सोनाली , साक्षी , अपर्णा धत्तुरे प्रिया दहिटणकर यांनी परिश्रम व सहकार्य केले.