तुळजापूर / प्रतिनिधी
 उस्मानाबाद जिल्हा हद्दीत पाणटपरी व तंबाखुजन्य  पदार्थ विक्रीला असलेली बंदी मागे घेण्याबाबत उस्मानाबाद जिल्हा पान व फेरी विक्रेता असोसिएशने  पालकमंञी व जिल्हाधिकारी यांना निवेदन.देऊन करण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचा उदरनिर्वाह पुर्णपणे पानपट्टी व्यवसायावर चालतो . गेल्या 140 दिवसापासुन पानपट्टीवर बंदी घातली गेली असल्यामुळे बंद आहे. त्यामुळे आम्हा सर्व पानटपरी दुकानदारांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट व दयनीय झाली आहे तरी ही बंदी उठवावी अशी मागणी करण्यात आली आहे .या मागणीस   छावा क्रांती वीर  संघटनेने  ही पाठिंबा दिला.
निवेदन देते समय  अध्यक्ष राजाभाऊ चोपदार, विजयनाना दंडनाईक,उपाध्यक्ष सतिश लोंढे,अण्णासाहेब रोचकरी,सचिव अस्लम भाई,शिवानंद शिंदे तसेच छावा क्रांतिवीर सेना उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष महेश गवळी आदींची उपस्थिती होती. 
 
Top