तुळजापूर / प्रतिनिधी
 तुळजापूरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नळदुर्ग रोड शाखेतील दोघांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले तर इतर दोघे इनकॉनक्लिसिव आल्यानंतर तातडीने बॅँक बंद करण्यात आली. बॅँकेत एकूण ११ कर्मचारी असून त्यापैकी ७ कर्मचाऱ्यांची अॅन्टीजन टेस्ट शुक्रवारी (दि. ४) घेतली. दरम्यान, अचानक बॅँक बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली.
गर्दीच्या ठिकाणी संसर्गाचा धोका अधिक असल्याने रॅपीड टेस्ट करण्यात येत आहेत. यामध्ये शुक्रवारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नळदुर्ग रोड शाखेतील सात कर्मचाऱ्यांची टेस्ट घेण्यात आली. यामध्ये दोघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले तर इतर दोघांचे इनकॉनक्लिसिव आले आहेत. त्यानंतर खबरदारी म्हणून तातडीने बॅँक बंद करण्यात आली.
दररोज ५०० ग्राहक बँकेत येतात ●: एसबीआयची नळदुर्ग रोड शाखा सर्वाधिक वर्दळीची बॅँक असून या बॅँकेत दररोज ५०० हून अधिक ग्राहक येत असतात. शाखेत एकूण ११ कर्मचारी असून खबरदारी म्हणून सर्वांची टेस्ट करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असल्याने खबरदारी म्हणून बॅँक बंद करण्यात आली आहे. ग्राहक सेवा केंद्रातून ग्राहकांना २० हजार रुपये पर्यंत रक्कम निशुल्क काढता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी ग्राहक सेवा केंद्राचा तर भरणा करण्यासाठी इतर शाखेत जाऊन सहकार्य करण्याचे अावाहन बँकेचे अधिकारी बाळासाहेब हंगरगेकर यांनी केले.

 
Top