उस्मानाबाद/ प्रतिनिधी -
नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थात पोक्रा अंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील आंबेवाडी येथे शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कृषी उपसंचालक अभिमन्यु काशीद, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्रवर जाधव यांच्या हस्ते उपस्थित 50 शेतकऱ्यांना फवारणी करताना वापरावयाच्या सेफ्टी  किटचे वाटप करण्यात आले.
 यावेळी मार्गदर्शन करताना अभिमन्यू काशीद यांनी पुढील वर्षाकरिता  सोयाबीन चे बियाणे जपून ठेवण्याकरिता आतापसूनच योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. चांगल्या प्लॉट ची निवड, प्रवाही बुरशी नाशक फवारणी, काढणी व साठवणूक करताना घ्यायची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी शेतीमधील उत्पादन खर्च कमी करणे, गटांच्या माध्यामातून कृषी संलग्र  व्यवसाय निर्मिती, पोक्रा अंतर्गत व्यक्तीगत लाभाचे घटक  याबाबत मार्गदर्शन केले. प्रकल्प विशेषज्ञ सचिन पांचाळ यांनी एकात्मिक कीड नियंत्रण, तुर शेंडा खुडने, फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. सरपंच श्री.कदम यांनी पोक्रा योजनेतून गावाचा कायापालट करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक राजकुमार ढवळ शंख यांनी तर नियोजन कृषी सहाय्यक, रंजना मुंडे, समन्वयक अमोल नागरगोजे, अजिंक्य पाटील, समूह सहाय्यक प्रमोद शिंदे, शेतीशाळा प्रशिक्षक विकास कांबळे यांनी केले.
 
Top