उस्मानाबाद/ प्रतिनिधी -
चार वर्षात यशस्वी कामगिरी करणारे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांची हिंगोली येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी सोलापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक ए. जी. नवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनुप शेंगुलवार यांनी चार वर्षात विविध महत्त्वपूर्ण योजनांची कामे पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे काही काळ मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचाही चार्ज होता. दरम्यानच्या काळात महिला बालकल्याण विभागातील पोषण अभियानात उत्कृष्ट कार्य करून जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून देण्यातही त्यांचा वाटा आहे. यासह इतर प्रश्नही अनुप शेंगुलवार यांनी सर्वांना विश्वासात घेवून सोडवण्याचा प्रयत्न केला. चार वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंदर त्यांची हिंगोली जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर बदली झाली आहे.