उस्मानाबाद/ प्रतिनिधी -
रोटरी क्लब उस्मानाबाद व उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीरात रोटरी क्लब उस्मानाबाद व उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन यांच्या सदस्यांसह 46 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन उस्मानाबाद येथील जिजाऊ चौकातील स्वयंवर मंगल कार्यालयात गुरुवार दि. 3 रोजी सकाळी 10 ते 2 या कालावधीत घेण्यात आले.
 उस्मानाबाद रोटरी क्लबचे नुतन अध्यक्ष रो.अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड-19 रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत येथील उस्मानाबाद हाफ मॅरेथॉनचे प्रेरणास्थान आयर्नमॅन श्याम शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इतर रक्तदात्यांची प्रेरणा घेऊन व रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.अमरसिंह देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रोटरी सदस्य इंद्रजित आखाडे व सन अल्युमिनिअनचे नवनाथ ढगे यांनी आयुष्यात प्रथमच रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शाशन नियमांच्या अधिन राहून त्याचे काटेकोरपणे पालन करत या रक्तदान शिबिरात नागरिकांनी  उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून या शिबिरात 46 रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोना काळातील आपले कर्तव्य पार पाडले. या सामाजिक उपक्रमात व कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून स्वयंवर मंगल कार्यालयाचे प्रमुख प्रीतम बागल यांनी या शिबिरासाठी मोफत जागा उपलब्ध करून सहकार्य केले.
      यावेळी रोटरी क्लब उस्मानाबादचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, सचिव इंद्रजीत आखाडे तसेच रोटरी क्लब उस्मानाबाद  उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन सदस्य चंदन भंडगे व अन्य  सदस्य  मान्यवर उपस्थित होते. या शिबिरासाठी रक्त संक्रमण अधिकारी डॉ.अश्विनी गोरे, अधिपरिचारिका सुषमा घोडके, रक्तपेढी तंत्रज्ञ आकानावरु, जनसंपर्क अधिकारी गणेश साळुंखे, रक्तपेढी परिचर दिलपाक मामा यांचे  मोलाचे योगदान लाभले.
 
Top