उमरगा / प्रतिनिधी-
केवळ प्रशासनावर व सरकारवर अवलंबून न राहाता,आपणही समाजाचे देणे लागतो ह्या उदात्त भावनेने येथील काही मुस्लिम युवकांनी, समाजातील नागरिकांच्या मदतीने व सहकार्याने , उमरगा शहरानजीकच्या ईदगाह येथील फंक्शन हॉल ला एका उत्तम सुविधायुक्त कोविड केंद्रात परिवर्तन करून आदर्श निर्माण केला त्याचे हस्तांतरण आज मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले .
यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले ,तहसीलदार संजय पवार , वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे ,नोडल अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार , जितेंद्रदादा शिंदे ,डॉ. उदय मोरे , नगराध्यक्षा सौ . प्रेमलता टोपगे , दिलीप भालेराव , पत्रकार राजेंद्र हुंजे, रोटरीचे सचिव अनिल मदनसुरे , नगरसेवक, व्यापारी व नागरिक उपस्थित होते .
यावेळी मान्यवर मंडळीनी मनोगत व्यक्त केले . सर्वसोयियुक्त हे कोरोना केंद्र उत्तम प्रकारे चालवून दाखवु अशी ग्वाही यावेळी देण्यात आली .यावेळी आर्ट ऑफ लिव्हिन्ग यांच्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्यूमन व्हॅल्यूझ या संस्थेच्या वतीने या कोव्हीड सेंटर साठी 10 पीपीई किट देण्यात आले. ३५ बेडचे केंद्र असून . सोशल मीडियातुन ‘ उमरगंस “ व उमरगा डिबेट या व्हाट्स ग्रूपच्या माध्यमातून आवाहन केल्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक मद्त मिळाली . याकरिता बाबा जाफरी, जाहेद मुल्ला, कलीम पठान, खाजा मुजावर, अय्युब मौलाना, हाफिज , अस्लमभाइ शेख , फिरोज लाला , नसीर खान, अज़हर शेख, अमजद मनियार, मनीष सोनी आदी तरुणांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबा जाफरी यांनी केले, सूत्रसंचालन मनिष सोनी तर आभार खाजा मुजावर यांनी मानले.