उस्मानाबाद/ प्रतिनिधी- 
तुळजापूर येथे आज रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम झाले तुळजापूर येथे घाटशीळ येथे प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. अनिल काळे यांचे हस्ते झाले.
 यावेळी सुहास साळुंके,शिवाजी बोधले,बाळासाहेब शमराज,सचिन अमृतराव,उमेश गवते,गिरीश देवळालकर, दिनेश बागल,नानासाहेब डोंगरे,ऋषकेश साळुंके उपस्थित होते. तसेच श्री तुळजाभवानी मंदिरासमोर परीक्षित साळुंके यांच्या पुढाकाराने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान क्रांती सेना व हिंदूराष्ट्र सेना यांच्यावतीने कार्यक्रम झाला . 
यावेळी मंदिरासमोर संस्कार भारतीच्या वतीने भव्यदिव्य अशी प्रभू रामचंद्रा ची  रांगोळीने प्रतिमा काढली होती या कार्यक्रमात अॅड. अनिल काळे यांचे मार्गदर्शन झाले व त्यांनी सांगितले की,  भारतातील नागरिकांची पाचशे वर्षांपूर्वीची मंदिर निर्मानची मागणी आज पूर्ण झाली याचा आनंद पूर्ण भारतातील सर्व जनतेस झाला आहे त्यामुळे दिवाळी साजरी होत आहे  या कार्यक्रमास परीक्षित साळुंके,संजय सोनवणे,ऍड.गिरीश लोहरेकर,बालाजी जाधव,अरण्य महाराज,ओंमकर पवार,किशोर शिरसट,बाळासाहेब शिंदे व इतर नागरिक  उपस्थित होते तसेच आर्यचौक तुळजापूर येथे मा.रावसाहेब कुलकर्णी काका व ऍड.अनिल काळे यांच्या उपस्तिथीत कारसेवकांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री कोंडो साहेब,हरिदास वट्टे व इतर वरील सर्व मान्यवर उपस्थित होते

 
Top