उस्मानाबाद / प्रतिनिधी- 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचे आज, बुधवारी पहाटे निधन झाले हि वार्ता समजताच मन खिन्न झाले. आम्हाला अतिशय दुःख झाले आहे. निलंगेकर यांचे राज्याच्या विकासात भरीव योगदान दिले आहे, अशी प्रतिक्रया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यंानी दिली. 
निलंगेकर साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अनेक खात्याचे मंत्री तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून भरीव व रचनात्मक कार्य केले आहे. लातूर जिल्हा, मराठवाडा व एकंदरीत महाराष्ट्र राज्याच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
आम्हाला आमदार, मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा कार्याध्यक्ष म्हणुन काम करत असताना त्यांचे सातत्याने अतिशय मोलाचे मार्गदर्शन राहिले आहे.
निलंगेकर साहेब हे अतिशय धाडसी, करारी व शिस्तप्रिय स्वभावाचे व्यक्तीमत्व होते. आजच्या त्यांच्या या निधनाने महाराष्ट्र व काँग्रेस पक्ष एका जेष्ठ, जाणत्या व निष्ठावंत नेतृत्वास मुकला आहे. 
निलंगेकर परिवारावर ओढवलेल्या या कठीण दुःखाच्या प्रसंगात आम्ही सहभागी आहोत व ईश्वरचरणी प्रार्थना की आदरणीय साहेबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

 जिल्हयाच्या सहकारक्षेत्रात सिंहाचा वाटा-दुधगांवकर
उस्मानाबाद-लातुर जिल्हा एकत्र असताना जिल्हयाचे पालकत्व मा.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे होते. जिल्हयात सिंचन प्रकल्प उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. उस्मानाबाद व लातूर जिले स्वतंत्र झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्हयात जिल्हा दुध संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अन्य सहकारी संस्था उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी केलेल्या कामाची आठवण कायम स्मरणात राहील, अशी प्रतिक्रया उस्मानाबाद जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील-दुधगांवकर यांनी दिली आहे. 
 
Top