आज अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील जन्मभूमीवरील मंदिर निर्माण कार्याचे भूमिपूजन अयोध्या येथे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने समर्थपणे केले आणि त्यासाठी वेळोवेळी विविध पद्धतीने आंदोलने केली या मध्ये अनेकांनी आत्मबलिदान सुद्धा दिले या सर्वाचे आज सार्थक झाले अशी भावना आज सर्वांच्या मनात आहे व प्रत्येक हिंदूंच्या मनातील आनंदाला उधाण आले आहे.
विश्व हिंदू परिषदेने याच भावनेतून आज जिल्हाभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या नियमांचे पालन करून व सोशल डिस्टन्सिंग राखून विविध मंदिरासमोर दिप प्रज्वलन, रांगोळ्या, प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन, प्रसाद वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तत्कालीन विहिंप जिल्हा मंत्री व ज्येष्ठ कारसेवक मसलेकर दादा व अॅड मिलिंद पाटील यांच्यासह इतर कारसेवकांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी अनेक मान्यवरांनी व अनेक वृत्तसंस्था व माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुद्धा स्वयंस्फूर्तीने आपली उपस्थिती नोंदवली होती. यावेळी विश्व हिंदू परिषद धारशिवच्या वतीने जगावर आलेले हे कोरोनारुपी दानवाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे असे प्रभू श्रीरामांना साकडे देखील घालण्यात आले.
या कार्यक्रमाच्या नियोजनात विहिंप जिल्हामंत्री श्रीकृष्ण धर्माधिकारी, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अॅड विक्रम साळुंके, विहिंप जिल्हाध्यक्ष श्री दत्तात्रय चौरे, अॅड. कृष्णा मसलेकर, मातृशक्ती जिल्हा संयोजिका प्रभावती मार्डीकर, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक अर्जुन साळुंके, दुर्गावाहिनी प्रखंड संयोजिका कु. श्रद्धा ठाकूर, बालाजी चव्हाण, श्री अतुल कुलकर्णी, श्री सुशील कुलकर्णी पांचाळ महाराज, श्री दत्ता माकोडे, राहुल पाटील यांचा सक्रिय सहभाग होता.