उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील ढोराळा, कोथळा, लोहटा पू.,कन्हेरवाडी, ईटकूर,बोरगाव (ध),पानगाव,रत्नापुर, दहिफळ, शिंगोली(माने), बोर्डा, खामसवाडी या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळुन आल्याच्या अनुषंगाने खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व कैलास घाडगे-पाटील यांनी भेट देऊन गावातील कंटेनमेंट भागात ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या नागरिकांशी चर्चा केली व त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या तसेच कोरोनाची भीती बाळगू नये, प्रशासनामार्फत दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन केले. याशिवाय गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम-३० या औषधी गोळ्यांचे वाटप करण्यासाठी सुपूर्द करण्यात आल्या. कंटेनमेंट भागातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रशासकीय यंत्रणेस देण्यात आल्या. दिवसेंनदिवस गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी  बालाजी बप्पा जाधवर, भारत नाना सांगळे,  प्रदिप बप्पा मेटे, सागर बाराते,  त्रिंबक शेळके,  असलम जमादार,  श्री.राजगुरू,  डॉ.जाधव,  डॉ.धनंजय चाळक,  श्री.नेटके,  श्री.कांबळे,  दिलीप चौगुले,  दिपक जाधव, .मेघराज देशमुख,  गोविंद पाटील, हनुमंत जाधवर, चरण पाटील,  प्रशांत धोंगडे, दौलतराव माने,   राहुल चव्हाण, अमोल पाटील, खामसवाडी उपसरपंच श्री.प्रभाकर शेळके, कोंबडवाडी उपसरपंच श्री.काकासाहेब मिसाळ, सुनिल नाईकनवरे,  भैरू नाईकनवरे, नंजय नाईकनवरे,  नितीन भोसले , श्री.प्रल्हाद चौधरी, श्री.पांडुरंग चौधरी, व्हाइस चेअरमन श्री.विलास राऊत,श्री.हरिभाऊ शिंदे,  मछिद्र पाटील,  रतन माळकर,श्री.बाळासाहेब शिंदे,  भारत शिंदे, श्री.हरिभाऊ तोडकर, श्री.चत्रभुज टेळे,  अक्षय कदम, सतीश शिंदे, ऋषिकेश पवार,  संतोष मगर,  माणिकराव मिटकरी,  विश्वजित कवडे,   मेटकरी सर, विजय कवडे, यश व यशवंत कवडे,  कपिल कवडे,  धर्मराज कवडे,  रणजित कवडे, सचिन काळे,  बाळासाहेब गंभिरे,  लक्ष्मण आडसूळ, विजय माने, पवन अडसूळ, दिनेश अडसूळ सर, अश्रुबा बिक्कड, पोपट चव्हाण, विवेक चव्हाण, दिलीप चव्हाण, गुलाब बेडके, ऋषिकेश पाटील, हनुमंत मते,  प्रवीण पाटील,  सुरेश मते, पोपट पाटील,  भातलवंडे डी.एस, रामेश्वर मते,  .नानासाहेब माने,  विजय मते,  बाळासाहेब मते,  प्रभाकर मते,  विजय पाटील,  बाबुराव शेळके, संतोष शेळके, ज्ञानदेव मासाळ,  अभिजित मासाळ, महेंद्र शेळके,  शिवाजी बोबडे, दिगंबर शेळके,  अक्षय शेळके, जयराम मिसाळ, बालाजी मिसाळ, महेश घाडगे, तलाठी तसेच पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्ती, आशा मदतनीस, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
 
Top