तुळजापूर/ प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ येथील मंदीर बंद होवुन आज पाच महिने होत आले असुन यामुळे पुजारी व्यापारी वर्गाचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सामाजिक अंतर नियम पाळुन मंदीर भाविकांनसाठी खुले करण्याबाबतीत प्रशासनस्तरावर प्रयत्न करण्याची मागणी शहरवासियांच्या वतीने माजीमंञी मधुकर चव्हाण यांनी शुक्रवार दि. 7 रोजी शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या उपस्थितीत बैठकीत केली.
या बैठकीमध्ये माजी मंत्री मधुकरराव चव्हाण साहेब यांच्यावतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये covid-19 या रोगामुळे मागील पाच महिन्यापासून तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद असल्यामुळे येथील देवीचे पुजारी व व्यापारी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे यांना मंदिर संस्थानच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे किराणा किट वाटप करण्यात यावेत. त्याचबरोबर सामाजिक अंतराची नियम पाळून मंदिर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत यावेळी बोलताना मधुकराव चव्हाण म्हणाले उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये covid-19 हा रोग अतिशय गतीने पसरत आहे याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होत आहेत असे यावेळी सांगितले .
या महामारीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सामाजिक अंतर मास्क तसेच शासनाच्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करावे व काँग्रेस कार्यकत्यांनी कोरोनाग्रस्तांचा मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी काँग्रेस पदाधिकारीनी डाँक्टरांची कमतरता बद्दल वैद्यकीय मंञी अमित देशमुख यांना सांगितले असता या बाबतीत डाँक्टर पाठवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर प्रदेश कार्यकारणी सदस्य बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, युवा नेते सुनिल चव्हाण , तालुकाध्यक्ष अमर मगर, नगरसेवक सुनील रोचकरी, रंणजीत इंगळे, लखन पेंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी, पदाधिकारी उपस्थितीत होते.