उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 कोरोना विषाणू (COVID-19) या संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक  उपाययोजना करण्याबाबत  भारत सरकारच्या आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्रालयाच्या “Management  of Suspect, Confirmed Cases of COVID-19” मधील मार्गदर्शक सुचना प्राप्त झालेल्या आहेत.
कोरोना संसर्ग वाढण्याची  शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व पूर्वतयारी योजना आखणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोना (COVID-19) विषाणूच्या संसर्गामुळे जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये. यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे. या पार्श्वभमूमीवर उक्त बाबी लक्षात घेता जिल्ह्यात कोरोना विषाणू (COVID-19) या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होवू नये व Management of Suspect, Confirmed Cases of COVID-19” मधील मार्गदर्शक सूचना यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 33 आणि 65 अन्वये उस्मानाबाद जिल्ह्यात खालील इमारत, ठिकाणे आरोग्य विभागाच्या अधिनस्त- COMID Care Center coo” म्हणून स्थापन करुन अधिसूचित व अधिग्रहीत करीत आहे.
COMID Care Center (CCC) स्थापन करण्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय मुलांचे वसतीगृह, उस्मानाबाद तालुका, उस्मानाबाद ची इमारत अधिग्रहीत करण्यात आली असून तेथील बेड ची संख्या-200 अशी आहे.
या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक, उस्मानाबाद व जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. उस्मानाबाद यांनी  दिलेल्या  मार्गदर्शक सूचनांनुसार उपरोक्त यंत्रणा स्थापन करुन सनियंत्रण करावे. तसेच सदरील माहिती डॅशबोर्डवर अद्ययावत करण्यात यावी.या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेशात नमूद आहे.
 
Top