उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोना कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.
श्री. कोंडेकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, एनआयसी विभाग) जि. का. उस्मानाबाद यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कोविड-19 चे अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, उस्मानाबाद, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. उस्मानाबाद यांच्याकडून माहितीचे संकलन करुन सदर माहिती डॅशबोर्डमध्ये नियमित अद्यावत केली जाईल याच समन्वय करणे, तसेच सदरचा डॅशबोर्ड रोज अद्यावत करुन जिल्हाधिकारी यांचे दालनातील, अपर जिल्हाधिकारी यांचे दालनातील, निवासी उपजिल्हाधिकारी यांचे दालनातील व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष येथील संगणकावर उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
श्री. श्रीकांत कुंटला, जिल्हा नियोजन अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे कोविड-19 चे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने लागणाऱ्या सर्व साहित्याच्या खरेदीसाठी करावयाची सर्व कार्यवाही, प्रशासकीय मान्यता इ. कार्यवाहीमध्ये समन्वय करणे तसेच आमदार निधी, सीएसआर निधी, स्वयंसेवी संस्थांमार्फत प्राप्त देणग्या, जिल्हा गौण खनिज प्रतिष्ठान निधी, राष्ट्रीय आरोग्य अभियान निधी इ. निधीची उपलब्धता, निधी मागणी, शिल्लक निधी, खर्च केलेला निधी इ. बाबत आवश्यक कार्यवाही करणे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 वर इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.