उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
शहरातील सर्व “आपले सरकार” (महा-ई-सेवा) मध्ये रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलिअर, अल्पभुधारक प्रमाणपत्र, भूमीहिन प्रमाणपत्र, ई.डब्ल्यु.एस. प्रमाणपत्र, डोमेशियल / नॅशनॅलिटी प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र
काढण्याकरीता ग्राहकाकडून शासनाचे मंजूर केलेल्या दरपत्रकापेक्षा चार पटीने रक्कम जास्तीची घेतली जात
आहे असे नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे याकडे लक्ष घालून “आपले सरकार”ऑनलाईन सेंटरमध्ये नागरिकांची होत असेलेली लुट थांबवून डक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी दिवेगांवकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सर्व आपले सरकार (महा-ई-सेवा) केंद्राची चौकशी करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी,
अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहलिस कार्यालय, उस्मानाबाद येथे तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नुतन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी मिलिंद चांडगे जिल्हा सचिव,कुणाल महाजन मनविसे जिल्हाध्यक्ष,सौरभ देशमुख मनविसे उपजिल्ल्हाध्यक्ष,पृथ्वीराज शिंदे,आदित्य लगदीवे उपस्थीत होते..