उस्मानाबाद / प्रतिनिधी-
सध्या कोरोना रोगाच्या महामारीने संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा त्रस्त असून तुळजापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. तुळजापूर शहरातील दोन्ही सेंटर मध्ये भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. अनिल काळे यांनी प्रत्यक्ष जावून पाहणी केलेली आहे. तेथे प्रचंड प्रमाणात अस्वच्छता असून त्याचा रूग्णांना त्रास होत आहे.तसेच दोन्ही सेंटरमध्ये लोकांना जे जेवण पुरखले जाते ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असून त्यामध्ये आळया व किडे निघत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्या ऐवजी वाढण्याचा संभव आधिक झालेला आहे. त्यामुळे शहरातील दोन्ही कोवीड सेंटर कोरोना बाधीतांना देण्यात येत असलेल्या निकृष्ट आहाराची चौकशी करून तत्काल कारवाई करण्याची मागणी भाजपाचे अॅड. अनिल काळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर येथे १२४ व १०८ भक्त निवास कोवीड सेंटर आहेत येथे एकूण १२१ लोक कोरोना पॉझिटीव्ह व ५७ लोक विलगीकरण आहेत. सध्या परिस्थितीत कोरोनाच्या भितीने नागरीक त्रस्त असून लोकांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. या सर्व प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावे व बांधीतांना दिल्या जात असलेल्या निकृष्ट आहार प्रकरणाची चौकशी करावी व बाधीत लोकांना न्याय द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तत्काल या प्रकरणी संबंधितांना बोलावून बैठक घेतली व चौकशी करून करवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी उपजिलाधिकारी शिरीष यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी वडगावे व अन्य अधिकारी उपस्थित होते.