उस्मानाबाद / प्रतिनिधी-
अयोध्या येथील ऐतिहासिक श्रीराम जन्मस्थळी राम मंदीर उभारण्यात येणार असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते दि 5 आॅगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता आयोध्या येथे राम मंदीर उभारणीचा भुमीपुजन समारंभ पार पडला. या निमित्ताने  उस्मानाबाद शहरातील कसबा भागातील राम मंदिरात  आ.राणा पाटील यांच्या हस्ते पुजाअर्चा करण्यात आली.
 या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. मिलींद पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित  होते    
अयोध्या येथील श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदीराचा पायाभरणी षुभारंभा निमित्त उस्मानाबाद कसबा येथील प्राचीन मंदीर येथे श्रीप्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचे पुजन  आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, कारसेवक अॅड. मिलींद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दत्ता कुलकर्णी, प्रदीप शिंदे, सतीष दंडनाईक, अॅड. नितीन भोसले, गणेश मोरे, राहुल काकडे, इंद्रजीत देवकत्ते, प्रविण पाठक, देवा नायकल, मोहन कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते. युवा कार्यकर्ते गणेष इंगळगी, अरूण विंचुरे, उत्कर्श देशपांडे, रूशीकेश कुलकर्णी, शिवम पवार यांच्या सहका‐यांनी कार्यक्रम आयोजित केला.
यावेळी उस्मानाबाद येथील जिल्हा न्यायालयासमोर, मौजे तडवळा, खामगाव, सांजा येथे श्रीराम प्रभुच्या प्रतिमेचे पुजन भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, गणेष मोरे, देवा नायकल, भारत लोंढे, गणेष करंजकर, नाना वाघ, किषोर माने, व इतर मान्यवर उपस्थित होते.
 
Top