उस्मानाबाद / प्रतिनिधी-
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नगरपरिषद  उस्मानाबाद येथे सोमवार दिनांक 10.08.2020 पासुन  उस्मानाबाद शहरातील व्यापा-यांच्या रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत त्याप्रमाणे आज पर्यंत 1946 एवढ्या व्यापा-यांची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 79 एवढे पॉझिटीव्ह रूग्ण शोधून काढण्यास मदत झाली. व्यापा-यांसाठी राबवण्यात आलेला हा उपक्रम उद्या म्हणजेच शनिवार दिनांक 15.08.2020 पर्यंत सुरू राहणार आहे. 
सदर तपासण्या करत असताना उस्मानाबाद  शहरातील व तालुक्यातील सामान्य नागरिकांना कोव्हिड-19 ची लक्षणे आढळून आले असता  सदर अभियाना मध्ये त्या नागरिकांच्या देखील तपासण्या  करून  घेण्यात आल्या व त्यांपैकी काही नागरिक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यावर त्यांच्यावर देखील वेळेवर उपचार करणे शक्य झाले .
सदर अभियानामध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचारी तसेच नगर परिषद कर्मचारी मेहनत घेत आहेत. येणा-या काळात उस्मानाबाद शहरातील कोव्हिड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांची रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करणे गरजेचे असल्याने येत्या सोमवार दि. 17.08.2020  पासुन सदर अभियान असेच सुरू ठेवाण्यासाठी मा. जिल्हाधिकारी सौ.दीपा मुधोळ-मुंडे यांना विनंती करण्यात आली व ती त्यांनी मान्य केली त्याप्रमाणे   सोमवार व मंगळवार दि 17 व 18 ऑगस्ट 2020 रोजी  नगरपरिषद कर्मचारी , नगर परिषदेने स्थापन केलेल्या प्रभाग समिती सदस्य,  पत्रकार, वकिल, इंजिनिअर  यांच्या तपासण्या  होणार आहेत व बुधवार दिनांक 19.08.2020  पासुन  उस्मानाबाद शहरातील प्रत्येक गरजू नागरिकांसाठी हे मोफत रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट  अभियान सुरू असणार आहे. 
मा. नगराध्यक्ष श्री.मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या वतीने  उस्मानाबाद शहरातील  नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला,  डोकेदुखी इत्यादी लक्षणे असतील त्यांनी बुधवार दिनांक 19.08.2020 पासुन सकाळी 10:00 ते दुपारी  02:00 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नगरपरिषद उस्मानाबाद येथे जाऊन आपली रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करून घ्यावी. 
सदर अभियान हे जोपर्यंत कोव्हिड-19चे संकट आहे तो पर्यंत राबवण्याचा आमचा मानस आहे. नागरिकांना विनंती की, कुठलाही आजार अंगावर न काढता वेळेवर उपचार घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नगरपरिषद उस्मानाबाद येथे रॅपिड ॲन्टीजेन तपासणी च्या करण्यात आलेल्या सोयीचा  लाभ घेऊन आपलं शहर कोरोना मुक्त ठेवण्यासाठी नगरपरिषद उस्मानाबाद व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
Top