उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्हा पोलिस दलाने दि.१२ ऑगस्ट रोजी जिल्हाभरात अवैध धंद्याविरोधात विशेष माेहीम उघडून केलेल्या कारवायांमध्ये एकाच दिवसात तब्बल ५० मटका बुकींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात ३० गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये जुगार साहित्य व रोख रक्कम असा एकूण ३५,०२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी कळंब येथील आकाश राउत, गोरखनाथ थोरात, उस्मानाबाद येथे राजेश कांबळे, शिंगोली येथून ऋषीकेश रणशृंगारे,वाशी येथून रमेश मोळवणे,जळकोट येथे नेताजी गंगणे, अणदूर येथे मल्लिकार्जुन नामणे, उस्मानाबाद शहरातून बबन तट व प्रमोद शेरकर, मकबुल टकारी, मुक्तार शेख, तडवळे येथे सोमनाथ पवार, प्रशांत देशपांडे अशा एकूण ५० जणांविरोधात जुगार कारवाया अंतर्गत ताब्यात घेऊन त्यांच्यावर एकूण ३० गुन्हे नोंदविले आहेत. एकाच दिवशी जिल्हाभरातील या कारवायामुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

 
Top