तुळजापूर /प्रतिनिधी-
तालुक्यातील बोरी येथील शेतातुन एका शेतकऱ्याचे पंधरा दिवसात दोन रेडे किंमत पन्नास हजार रुपये चे अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याने शेतकऱ्यांन खळबळ उडाली आहे.
या बाबतीत अधिक माहीतीअशीकी बोरी ता तुळजापूर येथील राजाभाऊ अण्णासाहेब भोसले या शेतकऱ्याचे बोरी शिवारात गट न  57 मध्ये शेत असुन यात गोठ्यात बांधलेल्या ,एक वर्षाचा रेडा किंमत दहा हजार  20/7/2020 रोजी चोरुन नेला यावेळी मरीआईला नेला असेल असा समज करुन शेतकरी गाप्प  बसला माञ नंतर 3/7/2020 तर चोरट्यांनी कहरच केला चक्क गोठ्याची दगडी भिंत पाडून चार वर्षाचा चाळीस हजार,रुपये किंमतीचा रेडा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला यावेळी अज्ञात चोरट्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी साहित्य ही चोरून नेले. या घटनेने सर्वञ खळबळ उडाली असुन शेतकऱ्यांना मध्ये भितीचे वातावरण पसरले शेतकऱ्यांच्या शेतावर डल्ला मारणा-या चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे

 
Top