कळंब ( शिवप्रसाद बियाणी
खामगाव- पंढरपूर या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सद्या अंतीम टप्यात आहे. याच मार्ग वरील कळंब शहरातील काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. हा चौपदरी रस्ता पुर्ण झाल्यावर शहराची कायापालट होणार आहे. खामगाव - पंढरपूर’ हा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. एकूण साडेचारशे किमतीपेक्षा जास्त लांबीच्या रस्ता असुन ‘दिंडी मार्ग’ ठरणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गास मजुरी डिसेंबर २०१५ रोजी देण्यात आली होती. 
  राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून यातील केज ते कळंब- येरमळा- कुसळंब या ६१ किलो मीटर च्या कामावर साडेचारशे कोटी रूपयांचे काम असुन हे काम मेगा  इंजिनिअरिंग ही कंपनी करत आहे. अनेक ठिकाणी या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर काही ठिकाणी प्रगती पथावर आहे. त्यामुळे शहरातील कामाला दिरंगाई होत होती. अखेर मागच्या २५ दिवसापासून कळंब शहराचा भाग असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा वरील येरमाळा रोडवरील मानधने पंप ते केजरोड वरील रिलायन्स पंप या दरम्यानच्या चार किमी रस्ता लांबीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.  शहरातील रस्ता सिमेंट कॉक्रीट मधून चारपदरी करण्यात येणार आहे. त्यानुसार रस्त्याचे खोदकाम करणे सुरू केले आहे. तर काही ठिकाणी मुरूम भराई, दबाई करण्यात आली आहे. तद्नंतर कॉंक्रिट चे काम केले जाणार आहे. 

💧कळंब शहराला जोडणारे केज, ढोकी, येडशी, भाटसांगवी,येरमाळा असे पाच रस्ते हे खामगाव पंढरपूर रा.महामार्ग यासह कळंब तेर ढोकी व कळंब लातूर, कळंब येडशी या तीन राज्यमार्गासह एकूण महामार्गाचे भाग आहेत. यातील कळंब ढोकी हा शहरातील मुख्य रस्ता हायब्रीड अन्युईटी अंतर्गत विकसीत होत आहे. तर रिलायन्स पेट्रोल पंप ते मानधने पंपा लगतचा केज कळंब बार्शी रस्त्यावरील भाग खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामातून चौपदरी होणार आहे. 
💧शहरातील ढोकी रोड, परळी रोड व बार्शी रोड हे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मार्गस्थ होणारे तीन मुख्यरस्ते विकसीत होत असल्याने शहराचे कायापालट होणार आहे. 
 💧खामगाव पंढरपूर रस्त्याचा भाग असलेल्या कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते परळी रोड, तर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी रोड असे दोन टप्यात चार किमी रस्ता करण्यात येणार आहे. यात दोन्ही बाजूने नाली, पेव्हड शोल्डर, फुटपाथ, कॉंक्रिट रस्ता, डिव्हायडर असे काम करणात येणार आहे. 
 💧रस्त्याच्या मध्यबिंदू पासुन दोन्ही बाजुस सात मीटर कॉंक्रिट बनविण्यात येण्याचे नमुद होते. यानंतर रस्त्याची आस्तित्वाची रुंदी ग्रहीत धरत या पुर्ण रुंदी रस्त्याचे काम विकसित करण्याचे निश्चित करण्यात आले. या नुसार सध्या दुभाजकाच्या मध्यबिंदू पासून दोन्ही बाजूने ८.०२ मीटर कॉंक्रिट रस्ता करण्यात येत आहे. या मध्ये थोडा बहुत बदल होण्याची शक्यता आहे.

 
Top