तुळजापूर /प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे घाटशिळेवरी राम सीतेची भेट झाली असुन या बाबतीत अशी आख्यायिका   श्रीतुळजाभवानी देवी अवतारकथा स्कंद पुराण खंडात सांगितली आहे.
दंडकआरण्य जंगलात घाटशिळ हे पवित्र ठिकाण आहे.श्रीशिवशंकर व पार्वती कैलास पर्वातावर  हे सारीपाठ खेळत असताना पृथ्वी तलावर पार्वतीचे लक्ष गेले तिथे राम सीतेचा शोध घेत असल्याचे  दिसले.असता पार्वती श्रीशिवशंकरांना म्हणाले की, मी प्रभुरामचंद्र फसवते तेव्हा शिवशंकर म्हणाले की, प्रभुरामचंद्र हे अंतरज्ञानी असुन ते तुला ओळखतील  त्यांना तु फसवू शकणार नाही .यावेळी श्रीशिवशंकर व पार्वती यांच्यात शर्यत लागली कि जर प्रभुरामचंद्र यांनी मला ओळखले तर मी भूतलावर जनतेचा कल्याणासाठी राहीन ,नाही ओळखले तर कैलास पर्वतावर परत येईन .
श्रीदेविने बालाघाट डोंगरावर  भलामोठ्या दगडी शिळेजवळ येवुन सीतेचे रुप घेऊन बसली .त्या वेळी सीतेच्या शोधात प्रभुरामचंद्र तिथे पोहचले त्या वेळी सीतेच्या रुपात देविला बघितल्यावर प्रभुरामचंद्र यांनी देविला ओळखले व त्यांच्या मुखातुन “तुकाई”असे शब्द बाहेर पडले.
प्रभुरामचंद्र यांनी देविला ओळखल्याने ते देविसमोर नतमस्तक होवुन तिचा आशिर्वाद घेतला येथे देविने प्रभुरामचंद्र यांना लंकेकडे जाण्याची दिशा दाखवली या भागात आजही डोंगरावर  घाटशिळ मंदीर शेजारी  अतिप्राचीन रामकुंडा असुन येथे आजही जिवंत पाणी आहे. आज ही या भागात घाटशिळेच्या दर्शनासाठी देविभक्त आवर्जून येथे दर्शनासाठी येतात

 
Top