उस्मानाबाद/प्रतिनिधी
कोरोनात लाइन स्टाफ कर्मचाऱ्यांवर लादलेल्या एजी असेट सर्व्हेच्या विरोधात इलेक्ट्रिसिटी लाइन स्टाफ असोसिएशनच्या वतीने १० ते १२ ऑगस्ट दरम्यान सामुहिक रजा आंदोलन पुकारले आहे. याकाळात औद्योगिक शांतता भंग पावल्यास त्यास संघटना जबाबदार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक विभागीय, उप विभागीय व शाखा अधिकारी हे एजी असेट सर्व्हे पूर्ण करण्यासाठी कोरोनाच्या काळात इलेक्ट्रिसिटी लाइन स्टाफवर दबाव टाकत आहे. मात्र, इलेक्ट्रिसिटी लाइन स्टाफ कमी शिकलेला असल्याने या सर्व्हेचे काम वर्ग ३ पासून पुढील उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांद्वारे करावे. सध्या दळणवळणाची सुविधा नाही, प्रतिबंधित क्षेत्रात वाढ झाली. देखभाल दुरुस्तीसाठी इलेक्ट्रिसिटी लाइन स्टाफ ग्राहक सेवा देत आहे. अद्यापही वरिष्ठ व्यवस्थापनाने सर्वेचे काम थांबवण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयांना आदेश दिला नाही. संघटनेने क्षेत्रीय कार्यालयांना विचारणा केल्यास मुख्यालयाचेच आदेश असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे संघटना १० ते १२ ऑगस्ट दरम्यान सामूहिक रजा आंदोलन कणार आहे. यादरम्यान औद्योगिक शांतता भंग झाल्यास त्याला संघटना जबाबदार राहणार नाही. निवेदनावर संघटनेचे सरचिटणीस राजुअल्ली मुल्ला यांची स्वाक्षरी आहे.