उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची दिवसेंदिवस वाढती रूग्ण चिंतेचा विषय बनला आहे. जिल्हा रूग्णालय उस्मानाबाद यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तसेच डा. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे एकुण  ४२० स्वॅब पाठविण्यात आले होते . त्याचा रिपोर्ट रविवारी दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारी प्राप्त झाला. त्यामध्ये   आणखी नव्या 206  जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता 2468 झाली आहे. तर जिल्हयातील एकुण बरे होऊन घरी केलेले रूग्ण ८१४ आहेत.तर सध्य परिस्थितीत एकुण १५९० रूग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत जिल्हयात एकुण ६४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्यामध्ये पॉजिटीव्ह आलेल्या रूग्णांची तालुका निहाय एकुण संख्या २०६ एवढी आहे. यामध्ये रविवारी प्राप्त रिपोर्टमध्ये उस्मानाबाद शहर व तालुक्यामध्ये ३७ रूग्ण, तुळजापूर ४७, उमरगा १९, कळंब ४९, परंडा २४, लोहारा ११, भूम १८, वाशी ०१ रूग्णांचा समावेश  आहे. याबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.



 
Top