उस्मानाबाद / प्रतिनिधी-
वर्तमान काळात समाजात वाढत असलेली हिंसक प्रवृत्ती घातक आहे. माणूस माणसांपासून दुरावत चालला आहे. संयुक्त कुंटुंब पध्दतीला विभक्तपणाचे तडे जात आहेत. पैसा, संपत्ती आणि पद यामुळे सामूहिक दरी वाढत आहे. त्यामुळे उदयाचा चांगला व निकोप समाज निर्माण करण्यासाठी मानवी मूल्ये जोपासावी लागतील. समाज उन्नतीची सगळी मूल्ये लोकशाहीर अण्णा भाउ साठे यांच्या साहित्यात पदोपदी दिसून येतात. म्हणून मानवी मूल्य जोपासण्यासाठी अण्णांच्या विचारांची गरज आहे. असे मत प्रसिध्द विधीज्ञ राजू कसबे यांनी व्यक्त केले.
लोकशाहीर अण्णा भाउ साठे यांच्या जन्मशताब्दी जंयती निमित्त सांजा येथे आयोजित अभिवादन सभेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पुढे बोलताना कसबे म्हणाले की, गावकुसाबाहेरचा समाज अण्णांनी आपल्या साहित्यात मांडला. संघर्षशील नायकांच्या माध्यमातून सामाजिक मूल्यांचा अविष्कार केला. सामाजिक समतेचा लढा लेखनीच्या माध्यमातून लढला. त्यामुळे अण्णांना भारतरत्न देणे हे आवश्यक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातले अण्णांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही.
याप्रसंगी माध्यमिक शालांत परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विशाखा साठे, रोहन मोहिते, कृष्णा मोहिते, शिवानी सुर्यवंशी आणि सृष्टी चांदणे यांचा शालेयपयोगी साहित्य देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्वराज चांदणे, सुभाष पाटोळे, साक्षी कसबे, राज लोंढे, सुनिल सुर्यवंशी, धनंजय झोंबाडे, श्रीराम सुर्यवंशी, तानाजी वनकळस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी अजय डोंगे, राजदिप गायकवाड, महादेव सुर्यवंशी, भागवत साठे, नंदाताई लोंढे, अमोल चिलवंत, माणिक साठे, संजय साठे, शेखर चांदणे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम चांदणे यांनी तर सुत्रसंचालन स्वप्निल चांदणे आणि आभार बालाजी झोंबाडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नामदेव चांदणे, रविंद्र चांदणे, नाना कसबे, स्वराज चांदणे, शुभम कांबळे, किरण पेठे, देवराज मेंढे, बबलू मोरे, दादा सुर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.