उमरगा/ प्रतिनिधी-
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा बौद्ध अनुयायास नवं संजिवनी आहे.बाबसाहेबांनी  आयुष्यात खूप खस्ता खाऊन आपला उद्धार केला आहे.एवढेच नव्हें तर भगवान बुद्धाच्या बुद्ध,धम्म,संघात समाविष्ठ केले.आपण त्याचे अनुयायी म्हणून  बावीस प्रतिज्ञाचे काटेकोर पणे पालन केले तर समाजात अमुलाग्र बदल होईल असे मत धम्मचारी यशोरत्न यांनी व्यक्त केले.
त्रिरत्न बौद्ध महासंघ उस्मानाबाद - लातूरच्या वतीने वर्षावास कालावधीत व  कोरोनाच्या लॉक डाऊन मध्ये प्रत्येक रविवारी झूम अँपच्या माध्यमातून धम्मप्रवचन मालिकेचे आयोजन केले आहे.रविवारी दि ९ रोजी बोधिसत्व परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा दिव्य संदेश या विषयावर विवेचन करताना यशोरत्न बोलत होते.या प्रसंगी धम्मचारी संघभद्र पुणे, धम्मचरिणी अमोघनेत्रीजी पुणे,धम्मचारी श्वेतकेतू दापोली,धम्मचारी रत्नपालित, धम्मचारी विरतकुमार आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना यशोरत्न म्हणाले की,वयाच्या १६ व्या वर्षी केळुस्कर गुरुजींनी दिलेले भगवान बुद्धाचे चरित्र वाचल्या पासून त्यानी बौद्ध धम्माचे आचरण करत धम्म जीवन जगत होते.त्यानीं कठीण परिस्थितीशी झगडत आपला उद्धार केला याची जाणीव आपण ठेवली पाहिजे नांनकचंद रतु यांच्या जवळ त्यानीं बोलून दाखवलेली खंत हा काफ़िला मागे फिरता कामा नये म्हणून आपण जागृत पूर्वक धम्म आचरण करावे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन केंद्राचे चेअरमन धम्मचारी ज्ञानपलीत यांनी केले पाली पूजा धम्मचारी कल्याणदस्सी यांनी घेतली धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 
Top