तेर / प्रतिनीधी
आपण अनेक ठिकाणी शिवपिंड पहातो पण उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथील हिंगळजदेवी मंदीरातील पुरातन शिवशंकराची मुर्ती   जात्यासारखी फिरते त्यामुळे पहाणाराचे लक्ष वेधून घेत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथील हिंगळजदेवी मंदीरात पुरातन शिवशंकराचे मंदीर असून या मंदीरातील शिवशंकराची मुर्ती चक्क जात्यासारखी फिरते हे विशेष.मुर्तीचा खालील भाग व शाळूंका व पिंड असे दोन मुर्तीचे भाग असून बेअरींग सारखे लाँक वजा बसविण्यात आलेले असून शिवपिंड गंडकी दगडापासून बनविलेली असून मुर्तीवर उत्क्रष्ट कलाकुसर केलेली आहे.विशेष म्हणजे ही मुर्तीची शाळूंका गोल फिरविली तर गरगरा गोल फिरते हे  विषेश.या मंदीरात उत्क्रष्ट कलाकुसर असलेल्या विष्णू-लक्ष्मी समवेत  गरूड व हणूमंताचे शिल्प,सूर्यनारायण देवी समवेत घोडयाच्या रथावर आरूढ असलेले शिल्प,गणपतीचे हातात विविध प्रकारची आयुधे असलेले सुरेख शिल्प,अष्टभूजा महीषासुरमर्दीनीचे शिल्प उत्क्रष्ट प्रकारचे कोरलेले आहे.

 
Top