उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक हभप रघुनंदन महाराज पुजारी यांची महाराष्ट्र राज्य अखिल वारकरी संघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य अखिल वारकरी संघाचे राज्य अध्यक्ष हभप मच्छिंद्र महाराज धानेपकर , राष्ट्रीय संघटक हभप पांडूरंग महाराज शितोळे यांनी हभप रघुनंदन महाराज पुजारी यांना निवडीचे पत्र दिले असून निवडीबद्दल हभप रघुनंदन महाराज पुजारी यांचें सर्वत्र कौतुक होत आहे.