उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची मागणी अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा केली आहे. याच मागणीसाठी उद्या २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. या होत असलेल्या आंदोलनास अखिल गुरव समाज संघटनेच्या वतिने देखील संपूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्रची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरासह राज्यातील इतर मंदिरे उघडण्याची मागणी अखिल गुरव समाज संघटनेच्या वतिन करण्यात आली आहेत.
केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे. देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना अखिल गुरव समाज संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष ा ॲड आण्णासाहेब शिंदे यांच्या वतिने या संदर्भात दोन वेळेस निवेदन देण्यात आले आहे. सर्व नियम मान्य करुन देखील देवस्थाने उघडण्याची मागणी महाविकासआघाडी सरकार मान्य करत नाही म्हणून महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. आध्यात्मिक समन्वय आघाडीने या आंदोलनाची हाक दिली आहे. अखिल गुरव समाज संघटनेच्या वतिने या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून महाराष्ट्रातील सर्व गुरव पुजारी बांधवानी व सामाजिक पदाधिका-यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान अखिल गुरव समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची अॉनलाईन कॉन्फरसद्वारे मिटिंग पार पडली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष ॲड प्रशांत खंडाळकर,प्रदेश युवा कार्यकारी अध्यक्ष सचिन धारुरकर,जिल्हा अध्यक्ष गोपाळराव नळेगावकर,जिल्हा युवा अध्यक्ष जितेंद्र पाटील,महाली जिल्हा अध्यक्ष विजयाताई पाटील तसेच संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सर्व मंदिरांसमोर हे आंदोलन होणार तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील गुरव पुजारी बांधवानी सहभाग घ्यावा. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटींसह या आंदोलनास फेस मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग पाळून सहभाग घ्यावा. असे आवाहन संघटनेचे प्रदेश युवा कार्यकारी अध्यक्ष मा.सचिन प्रविण धारुरकर यांनी केले आहे.