उस्मानाबाद / प्रतिनिधी -
 श्रृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, दु:ख उधळावयास, आता आसवांना वेळ नाही..! अशा काव्यमय शब्दात दहावी उत्तीर्ण झालेल्या मिनाक्षी साठे हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सांजा रोड काकानगर मध्ये राहणा-या मिनाक्षी साठे हिने तब्बल ६९.८०% टक्के गुण प्राप्त केले आहेत. गरीबीची चटके सहन करीत आणि घरकामात मदत करून मिळालेल्या वेळेत अभ्यास करून तिने हे यश मिळविले आहे.
 तिचे वडील रिक्षाचालक असून आई दुसऱ्याच्या रानात काम करून संसाराचा उदरनिर्वाह सुरू आहे. परंतु येणाऱ्या सर्व संकटावर मात करून व जिद्दीने परस्थितीला सामोरे जात मिनाक्षीने स्तुत्य अशी कामगिरी केली आहे. शिवाजी विद्यालयात शिकलेल्या मिनाक्षीने संकटांचा सामाना निडरपणे केला आहे. ती अतिशय मितभाषी असून सर्वाची लाडकी आहे. तिच्या या यशाबद्दल वडील मोहन साठे, चुलते जीवन साठे, भागवत साठे, आई मीरा साठे, चुलती कालिंदा साठे, आशा साठे, बंधु हर्ष साठे, महेश साठे, मयुर साठे, संकेत साठे, अजिंक्य साठे, बहिणी साक्षी साठे, प्रिती साठे, आजोबा दामू साठे यांच्यासह अनेकांनी तोंडभरून कौतुक केले आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना मिनाक्षी म्हणाली की, आपल्याला मिळालेले यश म्हणजे कष्टाचे फळ आहे. परीक्षेसाठी मी खूप अभ्यास केला होता. याकामी घरच्यांची खूप मदत झाली. शिक्षण क्षेत्रात चांगली शिक्षिका होणे आपले स्वप्न असल्याचेही तिने यावेळी नमूद केले.

 
Top