तुळजापूर / प्रतिनिधी-
जिल्हाधिकारी श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांनी माझे  स्वागत शैक्षणिक साहित्य देवुन करावे या आवाहनाला प्रतिसाद देत  जिल्हाधिकारी  हे तिर्थक्षेञ तुळजापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी श्रीतुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळाला भेट दिली असता त्यांना शैक्षणिक साहित्य भेट देवुन स्वागत केले.
या स्वागता बद्दल बोलताना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले अशा प्रकारे स्वागत केल्यास त्याचे चीज होईल या स्वागतासाठी मला मिळालेल्या वह्या व पेन हे मी जिल्हयातील शाळांना मधील गोरगरीब विद्यार्थांंना वाटप करणार असल्याचे सांगितले .श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळास भेट दिल्यानंतर अध्यक्ष  सज्जनराव साळुंके यांनी जिल्हाधिकारी यांना कवड्याची माळ   घालुन अकराशे वह्या व दोनशे पेन भेट दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष सचिन   रोचकरी.तहसीलदार सौदागर तांदळे   नागेश  साळुंके,  किरण भैया  क्षिरसागर प्राध्यापक धनंजय लोंढे  शांताराम  पेदे, नरेश अमृतराव, अविनाश  गंगणे ,शिवाजी बोधले, संभाजी भांजी, सुधीर रोचकरी, सचिन कदम, सुदर्शन झाडपिडे , विकास खपले, सुजय हंगरगेकर, विपीन शिंदे इत्यादी ज्येष्ठ सभासद सुधाकर   धुमाळ, प्रवीण कदम, बाबासाहेब खपले, संजय पेदे , तसेच गोविंद लोंढे, दीपक निकम , सौरभ गुंड उपस्थित होते
 
Top