तुळजापूर /प्रतिनिधी-
ऐतिहासिक अयोध्यातील श्री प्रभुरामचंद्र  मंदिर  भूमिपूजनचा  मंगल व आनंदमय  सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होताच तिर्थक्षेञ तुळजाई नगरीसह  तालुक्यात कोरोनाच्या सावटाखाली  आनंदोत्सव साधेपणाने सोशल डिस्टंन्स पाळुन  साजरा  करण्यात आला. हा सोहळा साजरा करण्यावर कोरोना ची सावट पुर्णपणे दिसुन आले
यावेळी विविध हिदुत्ववादी संघटनांच्या व भाजपा सेना पक्षाचा पदाधिकारींनी रामभक्तांनी  व अामदार राणाजगजतिसिंह पाटील व युवा नेतृत्व मल्हरदादा पाटील यांनी घरातच  प्रभुरामचंद्र प्रतिमा पुजन करुन घरावर भगवे ध्वज लावून आपला आंनद साजरा केला.  यावेळी घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती. ग्रामीण भागात रामभक्तांनी साखर वाटली.
 
Top