उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढत्या संख्या व त्यासाठी अपुरे पडत असलेले आरोग्य विभागातील तज्ञ डॉक्टरांचे बळ यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यातच मागील पंधरवड्यात अनेक डॉक्टरच कोविड-१९ चे पॉझिटीव्ह आल्याने अडचणीत भर पडली होती. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी उस्मानाबादेतील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत करत त्यांना कोविड-१९ वॉर्डकरीता कर्तव्यावरही नेमल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णाचा आकडा २७०० वर गेला आहे. त्यातुलनेत सर्वच ठिकाणी उपचाराकरीता डॉक्टरांची कमतरता भासत आहे. परिणामी उपलब्ध डॉक्टरांवरही अतिरीक्त ताण पडत असून याचा रुग्णांच्या उपचारावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण होत होती. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दि.१० ऑगस्ट रोजी आदेश काढून उस्मानाबादेतील ज्येष्ठ वगळता जवळपास सर्व खासगी डॉक्टर कोविड रुग्णालयात कर्तव्याकरीता अधिगृहीत केले आहेत. त्यांना दि.१० ऑगस्टपासूनच तीन शिफ्टमध्ये नियुक्त्याही देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात या नियुक्त्या दि.१० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान सकाळी ८ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री ९ व तिसरी शिफ्ट रात्री ९ ते सकाळी ८ वाजेपर्यंत निश्चित केल्या आहेत. यामध्ये शहरातील अस्थिरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, जनरल फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट आदी जवळपास ३५ डॉक्टरांचा समावेश आहे. तसेच दिलेल्या कर्तव्यात कोणी कसूर केल्यास, गैरहजर राहिल्यास कोविड-१९ च्या अनुशंगाने आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करून त्या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्यासाठी इंडियन मेडिकल कॉन्सीलकडे शिफारस करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.