उस्मानाबाद / प्रतिनिधी-
ऊस तोडण्याच्या कारणावरून उमरगा तालुक्यातील औराद तांडा येथे दोन गटात हाणामारी झाली. हा प्रकार शनिवारी सकाळी घडला असून दोन गटातील १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
शेतातील ऊस तोडल्याच्या कारणावरून मौजे औराद तांडा क्र. दोन येथील राठोड कुटूंबीयांतील रतन विठ्ठल राठोड, ललिता, पांडुरंग, सुधाकर, अनिता, गोविंद, भुराबाई राठोड यांच्या गटाचा तांड्यातीलच नातेवाईक सचिन केजु राठोड, शिलाबाई, निखील, केजु, बबली, नितीन राठोड यांच्या गटाशीवाद झाला. यात दोन्ही गटांनी परस्परांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले.

 
Top