तुळजापूर/ प्रतिनिधी-
कोरोना माहामारीत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या रानफुले यांची भूमिका अंत्यत महत्वाची असुन शेतकऱ्यांनी सेंद्रिय व विषमुक्तीवर शेती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष सचिन रोचखरी यांनी जागतिक अदिवासी दिनानिमित्ताने आयोजित रानभाज्या  महोत्सवाचा उद्घाटन सोहळ्यात केले .
या प्रसंगी कृषी अधिकारी एन टी गायकवाड उपस्थितीत होते. दरम्यान अनेक विविध  मान्यवरांनी शेती विषयक विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी तिर्थ खुर्द येथील  महिला शेतकरी कोमल पवार यांनी घरी बनवत असलेल्या  रानभाज्या  बद्दलचे फायदे सांगितले. महोत्सवात मांडण्यात आलेल्या  रानभाज्या प्रर्दशनात शेवगा, अंबाडी, तांदुळसा, उंबर ,घोळ, बांबु, कुर्डू, तोंडले, आगाडा, सरठी, भुईआवळा, गुळवेल , ठाकळा, केना, पातरवाघारी, कुंजीर, कवठाइ, रानभाज्यांचे प्रर्दशन त्यांच्या सविस्तर माहीती फलका सह मांडण्यात आले होते.या कार्यक्रमाचे सुञसंचलन जाधव यांनी केले तर आभार कृषी अधिकारी एन. टी  गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आलमले,  शेख, पवार ,आठाळे यांनी परिश्रम घेतले.

 
Top