उस्मानाबाद / प्रतिनिधी-
आपल्याच ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई पदास मंजुरीसाठी व पीएफ खाते ऑनलाइन करण्यासाठी सर्व कागदपत्र पंचायत समितीला पाठविण्याकरीता सात हजार रुपयांची लाच मागून ती स्विकारणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील सांगवी-काटीच्या ग्रामसेवकास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई सोमवारी (दि.१०) तुळजापूर पंचायत समिती कार्यालयात करण्यात आली.
तक्रारदार हे सांगवी (काटी) येथे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. परंतु, सदरील पद मंजूर नसल्याने हे पद मंजूर करण्यासाठी तसेच भविष्य निर्वाह निधीचे खाते ऑनलाइन करण्याकरीता आवश्यक कागदपत्र पंचायत समिती कार्यालयात दाखल करण्यासाठी ग्रामसेवक विजय नारायण चित्ते याने तक्रारदाराकडे सात हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबादकडे अर्ज दिल्यानंतर पंचासमक्ष लाचेच्या मागणीबाबत प्रथम खात्री करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक चित्ते याने सात हजार रुपयांची लाच मागून ती तत्काळ स्विकारण्याचे मान्य केल्यावर तुळजापूर पंचायत समिती कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराने दिलेली लाचेची ७ हजाराची रक्कम ग्रामसेवक चित्तेने पंचासमक्ष स्विकारताच त्याला पथकाने कारवाई करून ताब्यात घेतले. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उस्मानाबादचे पोलिस उपाधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, पोलिस हवालदार रवींद्र कठारे, पोलिस नाईक मधुकर जाधव, पोलिस शिपाई विष्णू बेळे, समाधान पवार, महेश शिंदे व चालक ज्ञानदेव कांबळे यांनी केली.