उमरगा / प्रतिनिधी-
शहरातील युवकांना प्रेरणा देणारे तथा सामाजिक सलोखा जोपासून सातत्याने युवकांना मार्गदर्शन करणारे प्रा व्ही एम पाटील, कमलाकर भोसले, पी के कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९९४ रोजी शहरातील सदन नगर भागात सदन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली.
प्रारंभी सामाजिक उपक्रम राबविण्यात येवु लागले. सार्वजनिक सदन गणेश मंडळाचे अध्यक्ष नितीन होळे यांनी पुढाकार घेवून सामाजिक उपक्रमाला व्यापक स्वरूप देत मंडळ सदस्य मनोज बिराजदार, संजय ढोणे, शिवानंद वाले, विनोदकुमार बिराजदार, गोविंद सोनवणे, लक्ष्मण गायकवाड, रविंद्र भोसले, सुधीर पवार, मनीष सोनी, प्रशांत पांचाळ, चंद्रकांत स्वामी, आनंद स्वामी, पप्पू स्वामी आदींच्या माध्यमा तून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले त्यामध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व, बुध्दीबळ, सामान्य ज्ञान, तालुका व जिल्हास्तरीय नृत्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या.सामाजिक उपक्रमास व्यापक करण्यासाठी सलग आठ वर्ष रक्तदान शिबीर, एड्स जनजागृती अभियान, शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण, कूपनलिका पुनरभरण योजना, युवक व नागरिकांच्या प्रबोधनासाठी अनेक संवाद तज्ञ, व्याख्याते यांचे विविध विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करून उत्सव काळात जातीय सलोखा व आनंदी जीवन, आरोग्य राखण्यासाठी उपक्रमावर भर देण्यात आला.
 जिल्हा व तालुकास्तरीय पुरस्कार 
सदन गणेश मंडळानी सलग १८ वर्ष राबविण्यात आलेल्या समाजोपयोगी उपक्रम, नियोजनबध्द श्री चे विसर्जन आणि उत्सव काळात घेण्यात आलेल्या सामाजिक आदर्शवत कार्यामुळे सार्वजनिक आदर्श गणेश मंडळाचा जिल्हास्तरीय पुरस्कार अन सलग सहा वेळा आदर्श गणेश मंडळाचा तालुकास्तरीय पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.एड्स बाबत व्यापक प्रमाणात जनजागृती अभियान राबविण्यात आल्याने जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक देवुन हि गौरविण्यात आले आहे.
 सन २०१२ ला उभारले मंदिर 
सन १९९४ पासून सन २०१२ पर्यंत म्हणजे सलग  अठरा वर्ष विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, प्रबोधन व आरोग्य विषयक उपक्रम घेण्यात आले. त्यानंतर याच ठिकाणी गणेश मंदिर व्हावे अशी सर्वांची इच्छा असल्याने सन २०१२ ला सदन गणेश मंदीर स्थापना सदगुरू ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली.गेली आठ वर्ष गणेश जयंती व गणेशोत्सवाच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केली जातात. यंदाच्या वर्षी कोरोना संसर्गाच्या काळात फक्त पुजा करून उत्सव साजरा केला जात असलातरी कोरोना संसर्ग विघ्न दुर झाल्यानंतर गणेश जयंतीनिमित्त उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सदन गणेश मंडळाचे अध्यक्ष नितीन होळे यांनी सांगितले.

७० च्या दशकात युवकांनी केलेल्या कार्याची प्रेरणा घेवून शहरातील नव्या दमातील युवापिढीने स्थापन केलेल्या सदन गणेश मंडळाने सुरुवातीच्या काळात जलसंवर्धन, एडस, रक्तदान यासह विविध धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून अल्पावधीतच मंडळाचा विस्तार वाढवून सुंदर व कल्पक अशा सदन गणेश मंदिराची उभारणी करण्यात आली. सामाजिक उपक्रमाची परंपरा यापुढेही अशीच सुरू ठेवण्याची अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

 
Top