उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मंुडे यांनी सोमवारी (दि.३) निवासस्थानाच्या परिसरात वडाच्या झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.त्यांनी गेल्यावर्षी शहरासह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली होती.  
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या रक्षाबंधनाला माहेरी गेल्या नाहीत. त्यांचे माहेर कर्नाटक राज्यात असून, सीमाबंदीमुळे त्यांचे बंधूही सणाला येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी फोनवरूनच भावाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच वडाच्या झाडाला राखी बांधून सण साजरा केला. दरम्यान, झाडे पर्यावरणाचे संवर्धन करतात. त्यामुळे आपण झाडांचे रक्षण करायला हवे, असा संदेश त्यांनी या सणाच्या माध्यमातून दिला.


 
Top